Yash Mhanje Kay ? Shilp Khaire

Yash Mhanje Kay ? Shilp Khaire

  • Rs. 249.00
  • Save Rs. 1


Join as Seller
पुस्तकाचे नाव : यश म्हणजे काय? -ग्रंथाली आणि बुकगंगा पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने यश म्हणजे काय? या प्रश्नाचा वेध घेण्याचा एका वेगळ्या प्रकारचा प्रयत्न शिल्पा खेर यांनी या पुस्तकात केलेला आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिथयश मंडळींच्या मुलांनी घेतलेल्या मुलाखती व त्या अनुषंगाने त्यांची आपसातील चर्चा, अशा स्वरुपात या प्रश्नाच्या उत्तराची उकल तरुण मंडळींपुढे मांडण्याचे काम मोठ्या समर्थपणे त्यांनी केले आहे. केवळ पैसा आणि प्रसिद्धी पुरत्या यशाच्या कल्पना मर्यादित न ठेवता त्या पलीकडेही खूप मोठे दालन उघडे असल्याचे मान्यवरांच्या अनुभव व कर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या वस्तुनिष्ठपणे मांडले आहे.प्रगल्भ विचार करण्याची क्षमता असलेल्या पण आजच्या भौतिकयुगाचा पगडा असलेल्या आजच्या तरुण वर्गाला हे विवेचन नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करेल अशी आशा वाटते. - डॉ. अनिल काकोडकर

We Also Recommend