
Women and Weight Loss Tamasha by Rujuta Diwekar
चांगलं दिसणं हे प्रत्येकालाच आवडतं. अनेक महिला सुडौल आणि बांधेसूद शरीरयष्टीसाठी कित्येकदा क्रॅश डाएटचा आणि अघोरी व्यायामाचा मार्ग अवलंबतात. पण सर्वसामान्य आहार कायम ठेवून, उपासमार न करता वजन कमी करता येतं. भारतातील आघाडीची, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आरोग्याचा हाच मूलमंत्र या पुस्तकातून दिला आहे. वजन कमी करण्याचे आततायी मार्ग अवलंबिण्याऐवजी आरोग्यासाठीचे या पुस्तकात सांगितलेले छोटे छोटे मंत्र निश्र्चितच उपयुक्त ठरतील. विशेष म्हणजे आजच्या धावपळीच्या जगात ‘सुपरवुमन’ बनू पाहण्याच्या वेड्या शर्यतीतल्या अनेक महिलांना अर्थपूर्ण आयुष्याबद्दलचा एक नवा विचार हे पुस्तक देतं. योग्य आहाराच्या कमतरतेमुळे आजकाल वाढीस लागलेले फायब्रॉईड्स, थायरॉईड्सचे प्रश्र्न, हार्मोन्सचे असंतुलन असे प्रश्र्न वाढीस कसे लागतात, पण योग्य आहाराने त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाऊ शकते, हेदेखील हे पुस्तक सविस्तरपणे सांगते.