
Vyasparv by Durga Bhagwat
कुणीच आपले काही टाकायला तयार नाही.हट्टी मूल हट्टाचे गाठोडे पोटाशी आवळते,त्याप्रमाणे कोमल भावांशी सर्वथा विरोध असलेला आपापला रोकडा देहस्वभाव सांडायला जर इथे कुणीच तयार नाही,तर मग या साऱ्या पात्रांना तारायला एक्च उपाय व्यासापुढे होता.तो म्हणजे नीती,तत्वबोध,विविध तऱ्हेचे ज्ञान कथेत वेळोवेळी घालून जी मूल्ये समाजात प्रतिष्ठा पावलेली आहेत,त्यांच्या आधारे कथेची प्रतिष्ठा राखणे.