
Vyasancha Varasa by Anand Vinayak Jategaonkar
आनंद जातेगांवकरांची ही कलाकृती महाभारतावरचं अप्रतिम विवेचन. जगामध्ये जोपर्यंत स्वार्थ, मत्सर, सत्ताकांक्षा आहे तोपर्यंत कलह माजणार, युद्ध होणार. सामोपचाराची भूमिका घेणारं व्यासांसारखं कुणीतरी असणार. भांडणारी माणसं आपल्या अहंकाराच्या, इर्ष्येच्या नशेत त्या व्यासांना धुडकावून देत स्वत:ला वागायचं तशी वागत राहणार आणि सर्वनाश झाल्यानंतर पश्चाताप करणार. महाभारत वाचणार्याला मग महाभारताचा उलगडा आजच्या वर्तमानाच्या संदर्भात होऊ लागतो. मग महाभारत ही केवळ एक पुराणकथा न राहता प्रत्येक पिढीसाठी ते वर्तमानातलं एक वास्तव बनतं.