Umada Lekhak Umada Manus by Aruna Dhere

Umada Lekhak Umada Manus by Aruna Dhere

  • Rs. 133.00
  • Save Rs. 17


Join as Seller

प्रिय वाळिंबे, तुमच्या पुस्तकांना ’वाचनीय’ हे विशेषण मी जाणूनबुजून लावीत आहे. ’वाचनीयता’ हा कुठल्याही ग्रंथाचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे हे पुष्कळ लोक विसरलेले दिसतात. नुसते चटपटीत लेखन म्हणजे वाचनीय नव्हे. अत्यंत गंभीर विषयावरचे लिखाणही ’वाचनीयता’ हा स्वतंत्र गुण दाखवू शकते. ललित साहित्यात बहुतेक लेखकांची - त्यात मीही आहे - स्वत:चे लेखन आकर्षक करण्याकडे प्रवृत्ती असते. आकर्षणासंबंधी प्रत्येकाच्या स्वभावानुसार निरनिराळ्या कल्पना असतात. शाब्दिक कोलांट्या उड्या मारण्यापासून ते अतिसाधेपणापर्यंत त्यात अनेक प्रकार आहेत. कित्येकदा ह्या असल्या कसरतींमध्ये लेखनातल्या महत्त्वाच्या घटना-प्रसंगांमधला जिवंतपणाच नष्ट होतो. मात्र, तुमचे पुस्तक मी वाचायला घेतले आणि त्यात इतका गुंगून गेलो की इतर सर्व कामे बाजूला ठेवून शेवटपर्यंत वाचत गेलो. वाचताना एक क्षणही वाचन थांबवावे असे वाटले नाही. - पु.ल.देशपांडे


We Also Recommend