Alt Text

The Dark Crusader By Alistair Maclean

  • Rs. 129.00
  • Save Rs. 111


Join as Seller
अनुवादक - अशोक पाध्ये

ई-सकाळ रविवार १८ डीसेंबर २००५
एकाकी गुप्तहेराची चिवट झुंज

साहस कथा, त्यातही संरक्षण दलांवरील कादंबर्‍या लिहिणार्‍यांत अॅलिस्टर मॅक्लिन यांचे नाव फार वर होते. त्यांनी स्वत: दुसर्‍या महायुद्धात नौदलात सेवा बजावली आणि नंतर ते जपान्यांच्या कैदेत होते. सुटका झाल्यावर ते कादंबरी लेखनाकडे वळाले आणि नौदलाच्या पार्श्वभूमीवर एकापेक्षा एक अशा सरस सतरा कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. अत्यंत अचूक निरीक्षण व वाचकाला खिळवून ठेवणार्‍या शैलीमुळे अॅलिस्टर मॅक्लिन यांचा खास वाचकवर्ग निर्माण झाला.
मॅक्लिन यांच्या कादंबर्‍यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांचे नायक अगदी साधेसुधे; पण चिवट असतात. परिस्थिती त्यांना नेहमीच प्रतिकूल असते आणि हे नायक त्यातूनही मार्ग काढून ईप्सित साध्य करतात. मॅक्लिन यांची 'द डार्क क्रुसेडर' ही कादंबरी अशीच आहे. ऑस्ट्रेलियात एका कंपनीत कामाला असलेले अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ एकाएकी गूढरीत्या नाहीसे होऊ लागतात. ब्रिटनने एक नवे क्षेपणास्त्र तयार करायला घेतलेले असते आणि अत्यंत गुप्त असलेल्या या प्रकल्पावर हे शास्त्रज्ञ काम करीत असतात. या प्रकल्पाची माहिती कोणाला तरी मिळालेली असते आणि त्यांना ते क्षेपणास्त्र हवे असते. शास्त्रज्ञ गायब व्हायला लागल्यावर साहजिकच गुप्तहेर खात्याचे लक्ष तिकडे जाते आणि लंडनमध्ये धावपळ सुरू होते.

शास्त्रज्ञाच्या बुरख्याखाली बेंटॉल या गुप्तहेराची या मोहीमेसाठी रवानगी होते. सोबत असते मारी होपमन ही दुसरी हेर. न कळत हे दोघे जवळ येऊ लागतात; पण प्रसंगच असे येतात, की बेंटॉलला प्रेम व्यक्त करायला वेळच मिळत नाही. मुख्य काम असते, ते शत्रू शोधण्याचे. सिडनेला जाताना वाटेत उतरवल्या गेलेल्या या जोडीवर अनेक संकटे येतात आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बेंटॉल त्यातून मार्ग काढत जातो. अखेर तो रहस्याच्या मुळाशी पोचतो आणि हादरतो. सत्य भलतेच निघते. नेहमीच्या शैलीत मॅक्लिन यांनी कादंबरी लिहिली आहे. अशोक पाध्ये यांनी तिचा सरस अनुवाद केला आहे. गुप्तहेरांचे कष्टाचे जग या कादंबरीत दिसते. वेगळे काही वाचणार्‍यांना ही कादंबरी नक्कीच आवडेल.
(प्रतिनिधी )

We Also Recommend