Tera Te Tevis by Mukta Chaitanya

Tera Te Tevis by Mukta Chaitanya

  • Rs. 139.00
  • Save Rs. 11


Join as Seller

तेरा ते तेवीस या वयोगटातल्या मुलींच्या अनुभवांना आणि त्यांच्या मनातल्या कोलाहलाला या पुस्तकाने वाचा फोडली आहे. अवघड वयातल्या मुलींना समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल.
- डॉ. राणी बंग.
***

तेरा ते तेवीस ही दहा वर्षं म्हणजे मुलींच्या आयुष्यातला सुंदर पण तितकाच अवघड काळ. या वयात त्यांच्या शरीरात बदल होतात; मनातही प्रश्नांचं काहूर माजतं. वागण्यात बंडखोरी येऊ लागते. स्वतःच्या इच्छा आणि आई-वडिलांनी घातलेली बंधनं यांचा तोल राखणं ताणदायक बनतं.
मुलींची होणारी ही घुसमट पिढ्यांमागून पिढ्या कुणी समजूनच घेत नाही. पण कुणी त्यांच्या विचारविश्वात डोकावलं तर काय दिसतं?
तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलींच्या भावविश्वाचं डोळे उघडणारं भेदक दर्शन.


We Also Recommend