
Superpower by Raghav Bahl
जागतिक महासत्ता बनण्याच्या स्पर्धेतले आघाडीचे दोन देश म्हणजे भारत आणि चीन! या दोन्ही देशांचा साकल्यानं तुलनात्मक अभ्यास पत्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातले ख्यातनाम उद्योजक राघव बहल यांनी या पुस्तकात मांडला आहे. दोन्ही देशांची क्षमता, त्यांच्यापुढची आव्हानं, प्रगतीचं आणि विकासाचं स्वरूप, बलस्थानं आणि दुर्बलता या मुद्द्यांच्या आधारे केलेला तौलनिक अभ्यास या पुस्तकातून उलगडतो. एक पत्रकार आणि एक उद्योजक म्हणून असणारा आपला आगळावेगळा त्यांचं दृष्टीकोन बाळगून राघव बहल यांनी दोन्ही देशांचा इतिहास, अर्थशास्त्र आणि राजकारण यांच्याबद्दल चर्चा केली आहे.