So Kul...By Sonali Kulkarni

So Kul...By Sonali Kulkarni

  • Rs. 199.00
  • Save Rs. 101


Join as Seller
सोनाली कुलकर्णीचं संवेदनशील जगणं रेखाटणारं, आयुष्य सुंदर आहे आणि जगताना प्रत्येक क्षण हा साजरा करायला हवा, यावरचा नितान्त विश्वास शब्दाशब्दांतून व्यक्त करणारे पुस्तक. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे लोकसत्ताच्या विवा पुरवणीत २००५ ते २००७ या दोन वर्षांच्या काळात प्रकाशित झालेले सदरलेखन. सोनालीचं सो कुल हे सदर म्हणजे तिने सलग दोन वर्षे वाचकांशी साधलेला मनमोकळा संवाद होता. सोनालीचं अभिनयक्षेत्र, तिची प्रवास करण्याची आवड, देश-विदेशातील तिची भ्रमंती, तिथली संस्कृती, माणसं जाणून घेण्याची तिची मानसिकता, दैनंदिन जगण्यातील असंख्य विषय आणि त्यावर तिची असलेली ठाम मतं या सार्‍यांचं कोलाज म्हणजे सो कुल हे सदर! शेअरिंगच्या पातळीवर व्यक्त झालेलं सोनालीचं एक स्वगत, आत्मसंवादच जणू! सोनालीच्या स्वभावातील स्निग्धता, मूल्यव्यवस्थेवर तिचा असलेला विश्वास आणि माणुसकीची आच तिच्या या सदरलेखनात सहजतेनं डोकावली होती आणि म्हणूनच कदाचित तिच्या या लिखाणाशी सारा वाचकवर्ग जोडला गेला. एका सेलिब्रिटीचं सदर या पलीकडे झेपावणारं, आपलंसं वाटणारं असं काहीतरी सोनालीच्या लिखाणात वाचकांना सापडलं. अभिनेत्री असल्यामुळे अभिनय क्षेत्रातील अनेक संदर्भ तिच्या या लिखाणात आहेतच, पण त्यासोबत भोवतालचे अनेक सामाजिक संदर्भ तिच्या लिखाणात ओघवत्या स्वरुपात यायचे. कधी कधी सोनाली अलिप्त होत स्वतकडे बघतानाही दिसायची. अगदी ट्रॅफिक जॅम, येणारे अनावश्यक एसएमएस यासारख्या दैनंदिन आयुष्यातील साध्या साध्या तणावांपासून समाजसेवेचा आव आणणार्‍या तथाकथित संस्था, दंगल आणि हिंसाचाराच्या घटनांचा खरपूस समाचार घ्यायला सोनाली बिचकली नव्हती. कुलजित रंधवाची आत्महत्त्या, शेजारच्या इमारतीत एका स्त्रीला होणारी मारहाण रोखण्यासाठी रात्रीच्या वेळेस तिने केलेला प्रयत्न यातून सोनालीची सामाजिक संवेदनाच व्यक्त झाली होती. निसर्गाची अनिवार ओढ, नातेसंबंधांबद्दलचा हळवेपणा नि ठिकठिकाणच्या शूटिंगबाबतचे तिचे अनुभव हे तपशीलाच्या पलीकडे झेपावून तिच्या लिखाणाला असलेली वैचारिक बैठकच स्पष्ट करतात. एका अभिनेत्रीतील संवेदनशीलता जिवंत असल्याची खूण तिच्या प्रत्येक सदरात वाचायला मिळते. ग्लॅमरच्या पलीकडंचं जगणंच तिने सो कुलच्या निमित्ताने शब्दांतून मांडलं आहे.

We Also Recommend