
Shreshtha Bharateey Balkatha by Baba Bhand
बालकांवर आपण जसजसे संस्कार करू, तसतशी त्यांची सर्वांगाने वाढ होत असते. त्यांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी सकस आहाराची आवश्यकता असते, त्याचबरोबर भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी उत्तम संस्कारक्षम वाचन साहित्याची नितांत आवश्यकता असते. मुलांच्या वाढत्या वयाबरोबरच हा उत्तम खजिना, त्यांची वाचनाची आवड आणि रूची समॄद्ध करण्यास मदत करील. भारतीय बारा भाषांतील १३० संस्कार गोष्टींचा हा खजिना. भारतीय बारा भाषांतील श्रेष्ठ बालकथा आणि त्यांचे मराठी अनुवादक आहेत. आसामी : शंकर क-हडे, उर्दू : श्याम कुरळे, उडिया : सरिता वैदय आणि बाबूराव शिंदे, कन्नड : राजाभाऊ मंगळवेढेकर आणि धों. वे. जोगी, गुजराथी : लीला शिंदे, मधुकर प्रधान आणि सुनीता प्रधान, तमिळ : दि. वि. जोशी, तेलगु : कल्याण इनामदार, पंजाबी : शंकर सारडा, बंगाली : विलास गिते आणि धुण्डिराज कहाळेकर, मल्याळी : अरुण देशपांडे, हिंदी : सुरेश सावंत आणि दत्ता डांगे, मराठी : संपादन : बाबा भांड या श्रेष्ठ भारतीय बालकथांचा अनुवाद म्हणजे बालसाहित्य वाचकांसाठी उत्कॄष्ट मेजवानीच आहे.