Alt Text

Shodhyatra By Arun Sadhu

  • Rs. 149.00
  • Save Rs. 151


Join as Seller
आपण कुठून आलो हे माहीत नाही, कुठे जाणार आहोत हेही माहीत नाही. आपल्या अस्तित्वाचं आणि विश्वाचं प्रयोजन काय हे माहीत नाही... आणि ती विश्वशक्ती न्यायी असेल तर मग दु:ख, दारिद्र्य, अन्याय, विषमता, अत्याचार, क्रौर्य, विकृती यांचं समर्थन कसं करायचं ....?
जुन्या स्थिरवाही मूल्यांची होळी होत असताना स्पर्धात्मक, भोगवादी आणि स्वार्थी अशा आधुनिक पर्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या श्रीधरची ही आगळीवेगळी, विचित्र आणि तरीही आज सर्वांच्याच वाट्याला येणारी अशी जीवघेणी शोधयात्रा.
श्रीधरला या यात्रेची वाट माहीत नाही आणि दिशाही नाही. यात्रेचे अंतिम उद्दिष्ट काय आहे हे ठाऊक नाही. आणि तरीही तो अपरिहार्यपणे व अपार अस्वस्थपणाने या कधीही न संपणार्‍या यात्रेमध्ये सामील होतोच आहे.
श्रीधरच्या या विलक्षण शोधयात्रेची ही कथा. वाचकांना अस्वस्थ करणारी.

We Also Recommend