Alt Text

Shitu By G N Dandekar

  • Rs. 49.00
  • Save Rs. 21


Join as Seller
मी माझी मानसकन्या शितू आपणाहाती सोपवीत आहे. आज माझे गेल्या अडीच वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. एवढा काल मी माझ्या शितूला मनाच्या उरीपोटी वागविले आहे. अनेक रसिकांना मी ही कथा ऐकविली. अनेकांना ती फार आवडली. अनेकांनी डोळे पुशीत आपले अंतर हालेले असल्याची कबुली दिली. मला माहीत आहे, ती आपण कदाचित माझ्या या विधानाला हरकत घ्याल. ती माझ्या लेकीची भलावणी आहे असे म्हणाल. ठीक आहे. ही भलावणी मी इथेच थांबवितो. कन्या दुसर्‍याच्या हाती सोपविल्यावर ती अशी आणि तशी आहे, हे सांगत बसणे बरे नव्हे. मात्र शितूवर संस्कार करण्यासाठी मी जे काय केले आहे, ते सांगायला हवे. शितू कोकणकन्या आहे. माझ्या वाडवडिलांची जन्मकर्मभूमी जरी कोकण असली तरी माझा बहुधा सर्व जन्म घाटावरच गेला. कोकणी जीवन, वातावरण, भाषा इत्यादी ऐन कोकणी वस्तूंशी मी जवळजवळ अपरिचितच होतो म्हटले तरी चालेल. पण कोकणविषयक आकर्षण मात्र माझ्या मनी विलक्षण! अलीकडे कोकणातील आमचा गाव आणि माझे आजोळ या दोन्ही गावी वारंवार जाऊन मी माझी कोकणदर्शनाची हौस भागवून घेत असतो. असेच एकदा खाडीच्या पाण्यावर हेलकावे खात असलेल्या नावेतून दाभोळ ते गुडघे हा प्रवास करीत असता माझ्या मनी शितू जन्म पावली. लगेच मी कोकणचे सडे, तळ, धारी, राने, खलाटया, खाडया, बंदरे या सर्वांशी प्रत्यक्ष हिंडून घनिष्ठ परिचय करून घेतला. करवंदीच्या काटयांनी झाडांच्या खोडावर टोचलेल्या पानांवर आमच्या घरच्या ठासणीच्या बंदुकीचे बार टाकले. कोकणचे ताठ म्हातारे कुळवाडी आणि म्हातार्‍या यांच्याशी त्यांच्या घरांच्या उंबरठयांवर बसून गप्पा मारल्या. त्यांनी सांगितलेल्या खवीसहडळींच्या गोष्टी भाविकपणे ऐकल्या. त्यांच्याकडून, दर्यागीते, लावण्या, चकवे ही कोकणगीते म्हणवून घेतली आणि ती लिपीबद्ध केली. तिथल्या वनस्पती, चालीरीती, संकेत, पक्षी, लावणी, बेरणी, भाजणी, नावे, आचार-अगदी शिव्यासुद्धा-एका टिपणवहीत आवर्जून टाचून घेतल्या. कधी माझ्या घरी आलात तर मी तुम्हांला ती माझी वही दाखवीन!

We Also Recommend