Alt Text

Shikhare Rang Reshanchi by Ravi Paranjpe

  • Rs. 999.00


Join as Seller
एक चित्रसुगंध गाथा: शिखरे रंग-रेषांची -
जाहिरात आणि प्रकाशन क्षेत्रात आपल्या वैविध्यपूर्ण चित्रशैलीनें सर्वपरिचित चित्रकार "रवि परांजपे" यांनी हातात कुंचल्याऐवजी लेखणी घेऊन "शिखरे रंग-रेषांची" या अभ्यासपूर्व आणि शैलीदार पुस्तकाची निर्मिती केली. चहू रंगानें उच्चप्रतीचें असे हे मराठीतील पुस्तक म्हणजे एक संदर्भग्रंथच आहे. हे पुस्तक म्हणजे जगभराच्या काहीं महत्वाच्या चित्रकारांनीं पसरवलेल्या चित्रसुगंधाची गाथा आहे. चित्रकलेच्या क्षेत्रात पारंपारिक कलामूल्यांना डावलून कलाकाराच्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे प्रतीक बनून जी कला उभरली त्यामुळे चित्रकलेत प्रदूषण आले, कलेत पावित्र्य उरले नाहीं असे वाटून लेखकाने १८७४नंतरच्या शतकांतील जागतिक स्तरावरील २५ थोर चित्रकारांच्या कलेविषयी लेख लिहिले. हे लेख उत्कंठा वाढवणारे व सर्वसामान्य रसिकांना आनंद देणारे आहेत. नवे-जुने कलाकार, कलाविद्यार्थी यांना संग्रही ठेवावे वाटेल असे हे पुस्तक आहे.
जगातील महाकलाकारांची ६२ उत्कृष्ट रंगीत चित्रे, विपुल कृष्ण-धवल चित्रे असलेले हे पुस्तक म्हणजें "चित्रकला ही एक दृक आनंदयात्रा आहे, चित्रपंढरीच्या दिशेने चालू राहिलेली एक वारी आहे" असे समाधान देणारे आहे.

We Also Recommend