Alt Text

Shikasta By N S Inamdar

  • Rs. 199.00
  • Save Rs. 151


Join as Seller
नियती माणसाचे बोट धरून त्याला असेच वागवणार आणि त्याचा शेवटही असाच होणार. 'असंच' म्हणजे नियती योजेल 'तसंच'. आणि तसंच घडलं एका राजघराण्यातल्या दुर्दैवी स्त्रीच्या आयुष्यात. ती ही 'पार्वतीबाई पेशवे' ..... एक मुत्सद्दी पेशवा सदाशिवराव भाऊ पेशव्यांची ही अर्धांगी.
पानिपतात नाहीशा झालेल्या आपल्या पतीच्या, सदाशिवराव भाऊंच्या भेटीचा घेतलेला ध्यास, त्यासाठी त्यांच्या कुवतीनुसार त्यांनी केलेली धडपड, इतरांची त्या संबंधात कधी उपकारक तर कधी विरोधी पतिक्रिया आणि या धडपडीचा नियतीने केलेला शेवट ... अशी ही 'शिकस्त'.

महाराष्ट्र टाईम्स ..... "स्त्रीच्या दु:खाचा अविष्कार" शिकस्तच्या निमित्ताने इनामदारांनी प्रथमच स्त्रीच्या आयुष्याची शोकांतिका रंगवलेली आहे. तोतया प्रकरणाची एक संभाव्य अशी घटनांची संगती लावली आहे. ती जितकी कलात्मक तितकीच तत्कालीन स्त्रीजीवनाची उपेक्षीत बाजू दाखवणारी आहे. ही एका स्त्रीची विशिष्ठ कालखंडातली प्रातिनिधिक कहाणी आहे.

केसरी ..... "पार्वतीबाईंच्या होरपळीचे चित्रण" तोतया प्रकरणाभोवती निर्माण होणारी गूढतेची वलये आणि त्यात अडकलेल्या पार्वतीबाईंची चातकी होरपळ या भोवती इनामदारांनी त्यांच्या नेहमीच्या सफाईने गुंफली आहे. प्रभावी शैली हे त्यांच्या यशाचे एक महत्वाचे रहस्य आहे. व्यक्तीच्या जीवनाचा शोकांत हा इनामदारांच्या चिंतनाचा विषय आहे.

तरूण भारत ..... विधवा आणि सधवेच्या सीमारेषेवर असलेल्या पार्वतीबाईंची मानसिक आंदोलने ही वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहेत. पाच यशस्वी कादंबर्‍या देणार्‍या इनामदारांच्या लेखणीबद्दल, विषयाच्या मांडणीबद्दल नव्याने काही सांगायला नको. या वेळी त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे ते प्रमुख व्यक्तीरेखेच्या अचूक निवडीबद्दल.

सकाळ ..... "उपेक्षित स्त्रीजीवनाचा परिणामकारक वेध' कादंबरीच्या परिणामकारकेत पेशवाईचे राजकीय, सामाजिक चित्रण व संशयी अस्थिर वातावरण यांचा मोठा वाटा आहे. या संदर्भात लेखकाची बारिकसारिक उल्लेखाबाबत घेतलेली दक्षता स्पृहणीय आहे.

We Also Recommend