
Shaktipith (शक्तिपीठ) by Rajiv Purushottam Patel
जगन्माता अत्यानंदानं म्हणाली, तू नुसता परमशक्तीशी एकरूप होउन जातोस. अद्वैतात सगळयाच वृत्तीचं विसर्जन होत असतं. आपल्याला तर सृष्टीत सर्जन करायचंय. सगुणकारासाठी परमोच्च का होईना इच्छा व्यक्त करावी लागते. त्याशिवाय का अहं येउन मला आकार प्राप्त होईल ? मला हे माझं निराकार रूप नको आहे. मला भक्तांसाठी सगुण व्हायचंय. माझे भक्तांना जशी मी हवी तशीच मला व्हायचंय.