Shahu Modak Pravas Eka Devmansacha by Sudhir Gadgil

Shahu Modak Pravas Eka Devmansacha by Sudhir Gadgil

  • Rs. 249.00
  • Save Rs. 51


शाहू मोडक हे रुपेरी पडद्यावरचं सात्त्विक व्यक्तिमत्त्व असं म्हटल्यास वावगं ठरू नये. रजतपटावर तब्बल 29 वेळा त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका रंगवली; तर संत ज्ञानेश्र्वर या भूमिकेला पडद्यावरच नव्हे, तर पिढ्यान् पिढ्या प्रेक्षकांच्या मनात जिवंत ठेवले आहे. अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या शाहूरावांची प्रत्यक्षातली भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणाऱ्या शाहूरावांनी व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी लिहिलेल्या आणि सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकित केलेल्या शाहूरावांच्या आठवणी म्हणजे हे पुस्तक आहे! रुपेरी पडद्यावर तर शाहूरावांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेच. माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. शाहू मोडक यांच्या या चरित्रातून तत्कालीन चित्रपटसृष्टीचं आणि अभिनेता म्हणून त्यांनी तेव्हा पेललेल्या आव्हानांचंही दर्शन घडतं.

We Also Recommend