Sattar Divas By Ravindra Gurjar

Sattar Divas By Ravindra Gurjar

  • Rs. 69.00
  • Save Rs. 21


Join as Seller
पिअर्स पॉल रीड या लेखकाच्या "अलाइव्ह" कादंबरीचा अनुवाद
१२ ऑक्टोबर १९७२, 
युरुग्वे एअर फोर्सच्या फेअर चाइल्ड ए २२७ ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली.
रग्बी खेळाडूंचा हौशी संघ चिलीकडे निघाला होता. अॅंडीज पर्वत ओलांडून त्यांना जायचं होतं.
अॅंडीज हा हिमालयाच्या बरोबरीचा पर्वत-समूह.
त्याची लांबी जगामध्ये सर्वात जास्त.
त्यावरुन फेअर चाइल्ड विमान जाऊ लागलं आणि अचानक ते ढगात शिरलं. हिमवर्षाव चालूच होता.
झंझावती वार्‍यानं विमानाला दोन प्रचंड तडाखे दिले.
दुपारी ३.३० वाजता वैमानिकानं सॅंटियागो विमानतळावर सब ठीक चा संदेश दिला.परंतु त्यानंतर एकाच मिनिटाने सॅंटियागो टॉवरचा संपर्क तुटला.
पुढचे आठ दिवस चिली, अर्जेंटिना आणि युरुग्वेच्या लोकांनी विमानाचा जारीने शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ.
अॅंडीजची शेकडो मैल लांबी, वादळ आणि हिमवृष्टी लक्षात घेता, विमान सापडण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी झाली.
उतारुंपैकी कोणीही वाचण्याचा संभव तर अजिबात नव्हता. दहा आठवडयांनंतर एक चिली शेतकरी आपल्या गुरांना चारण्यासाठी अॅंडीजच्या खोल दरीत गेला असताना त्याला दूरवर दोन माणसांच्या आकृत्या दिसल्या.
त्यांचं स्वरुप भयानक होतं आणि ते गुडघ्यांवर खुरडत होते.
शेतकर्‍याला जवळ येण्यासाठी जोरजोरात खुणावत होते. भीतीमुळे त्यानं दुरुनच रुमालातून कागद-पेन त्यांच्याकडे फेकलं. दाढी वाढलेल्या, भाकस चेहेर्‍याच्या आणि कपडयांचा चिंध्या झालेल्या त्या इसमाने काही तरी लिहून कागद परत फेकला.
त्यावर लिहिलं होतं :
पर्वतावर कोसळलेल्या विमानातील मी एक उतारू आहे.
मी युरुग्वेचा रहिवासी ....
त्या दुर्दैवी अपघातातून पंचेचाळीस जणांपैकी बचावलेल्या सोळा लोकांनी सांगितलेली त्यांच्या सत्तर दिवसांची ह्रदयद्रावक सत्यकथा ...

We Also Recommend