Alt Text

Sat Na Gat By Rajan Khan

  • Rs. 149.00
  • Save Rs. 151


Join as Seller
'सत ना गत' ही राजन खान यांची नवी कादंबरी. एका मुख्यमंत्र्याच्या गावी एका फौजदाराने एका दलित स्त्रीवर केलेल्या बलात्काराची बातमी तेथील एका लंगोटी साप्ताहिकात आल्यावर तेथील वेगवेगळ्या सामाजिक, राहकीय शक्ती या घटनेचे भांडवल कशा प्रकारे करतात त्याचा एक वास्तवादी पण मनोवेधक पट चितारणारी आहे. या घटनेचा फायदा घेऊन तेथील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी जो तो आपल्या परीने व्यूहरचना करीत राहतो; आणि त्यातून अनेक उलथापालथी होतात. मूळ घटनेतील संबंधित व्यक्तींच्या न्यायनिवाड्याऐवजी पत्रकार, पोलिसयंत्रणा, शासकीय अधिकारी, निरनिराळ्या पक्षांचे राजकीय कार्यकर्ते, दलित-स्त्रीवादी संघटनांचे प्रवर्तक, मुख्यमंत्र्यांचे सखेसोयरे आणि विरोधक यांचे सर्वांचे आपमतलबी हिशेब व डावपेच यांनाच विशेष महत्व मिळते; आणि सद्य:काळातील समाजाच्या दिखाऊ समतोलाचा पायाच किती ठिसूळ, लिबलिबीत आहे याचे जे भयावह अंत:स्वरूप आहे, त्याची दिसणारी ओझरती झलकही आपल्याला आपल्या पायाखालची जमीनच कोणी काढून घेते आहे यासारख्या भयाने अस्वस्थ करून सोडते.
-- शंकर सारडा, ललित, फेब्रु. २०००

We Also Recommend