Sashache Sinhavalokan by V S Khandekar
वि. स. खांडेकरांनी आपल्या जीवनात आत्मपर असं विपुल लेखन केलं. त्या लेखनात आत्मगौरवापेक्षा कंठलेल्या जीवनाची तटस्थ चिकित्सा आढळून येते. त्यामागे सिंहावलोकन करण्याची वृत्ती दिसते. हा आत्मपर लेखसंग्रह त्याचंच उदाहरण. मागं न पाहता सुसाट धावणारा ससा हरतो. सिंहावलोकन करणारी माणसं जीवन जिंकतात. जो साहित्यिक आपल्या जीवन व साहित्याची सुसंगती शोधत पुढे जातो, तोच समाजास पुढे नेऊ शकतो. हे समजावणारं ‘सशाचे सिंहावलोकन’ एकविसाव्या शतकातील गतिशील माणसांना नि साहित्यिकांना केवळ श्रद्धा नि सबुरी देत नाही तर जीवनाची सापेक्ष दृष्टीही देते!