Sarvsakshi By Sanjeevani Khair

Sarvsakshi By Sanjeevani Khair

  • Rs. 229.00
  • Save Rs. 21


Join as Seller
सर्वसाक्षी सूर्याच्या असंख्य कथा, दंतकथा, लोककथा, लोकश्रुती प्राचीन संस्कृतीत आहेत. त्यातून अनेक मिथकं तयार झाली आहेत. पण त्यातूनही अदभूत, जादुई वास्तव डोकावं असतं. काल्पनिकतेची मूळही वास्तवात असतात. प्रत्यक्ष दिसणार्‍या सूर्याच्या तप्त गोळ्यावर जगभरातील मानवाचं व्यक्तिमत्वाचे, रागलोभाचे, संसाराचं, चमत्काराचं आरोपण केलं आहे. ह्या तेजोनिधीवर सर्वस्वी अवलंबून असणार्‍या मानवी संस्कृतीतून विस्मयकारी, मोहमयी तरीही वास्तवाचा पदर असलेली मिथकं निर्माण झाली. या मिथकातून दिसणारा सूर्य हा तरुण लढवय्या, सृजनाचा कारक आहे. डोळ्यांनी दिसणारा अनुभवता येईल असा हा एकमेव देव आहे. साहित्य, चित्र, शिल्प, विचार, आचार यातून तो आपल्याला खुणावत असतो. मिथकांची मजा त्यातील अर्थाच्या प्रकट-अप्रकट स्वरूपात असण्यातच आहे. जगभरची मिथकं आपलं अस्तित्व आज हजारो वर्षे घट्ट टिकवून आहेत. इथे तर समोर दिसणार्‍या गोष्टीचंच मिथक केलं गेलंय! हे पुस्तक वाचकाला मिथकातील अर्थ शोधायचा आनंद देईल अशी आशा करते.

We Also Recommend