
Sanganak Yug by Achyut Godbole
संगणक युगाच्या आगमनाने अनेक क्रांतिकारी बदल घडत आहेत. त्यांचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असलेला आपण पाहतच आहोत. भारतासारख्या अर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशाला हे संगणक-युग आशेचा मोठा किरण आहे. या युगाच्या गतीशी आपण सुसंगत राहिलो तर आपल्याला प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत बसण्याचीही संधी असेल. संगणक-युगाचा अवतार कसा असेल याचे वास्तव, विज्ञाननिष्ठ चित्रण अच्युत गोडबोले यांनी आपल्या सहजसुंदर शैलीत इथे केले आहे.