
Sambhramachya Laata by Ratnakar Matkari
काळोखातून आपल्याच दु:खाची वाट चालत नंदिता स्मशानभूमीत येऊन पोहोचलेली. लांबवर एक चिता जळत असलेली. तिचा अंधुक उजेड सगळीकडे पसरलेला. तोही मधूनमधून कमीजास्त होत असलेला. धाप लागल्यासारखा. इथेच-इथेच तो आला! सैरभैर ती त्याला शोधते. हे सगळे हरवलेल्यांचे जग! इथे कोण कुठे, अग्नीचे पांघरूण लपेटून चिरनिद्रा घेता घेता नाहीसे झाले, ते कसे कळणार? पण नाहीसे झाले म्हणजे सर्वत्र पसरले... पंचमहाभूतात मिसळले... म्हणजे इथेच-इथल्याच कणाकणात तो आहे... आणि नाहीही... नंदिता भ्रमिष्ट होऊन गेली... घाटाच्या पायर्या उतरून ती गंगेच्या पाण्याजवळ उभी राहिली... पाणी पंचमहाभूतांपैकीच एक. नंदन यातही मिसळला असेल का? मला त्याच्याबरोबर पंचमहाभूतात विलीन होता येईल का? का नाही येणार?... समोर पसरलेले हे पात्र... काळोखाचे रहस्य उघडणारे हे दार... मी या दारातून आत गेले, तर काळोखात मिसळलेल्या नंदनशी माझी भेट होईल...? रत्नाकर मतकरी यांच्या विलक्षण वर्णनशैलीने नटलेल्या, वास्तव आणि त्यापलीकडचे वास्तव, यांच्यातील धूसर सीमारेषेवरच्या गूढकथांचा हा संग्रह.