Samantar By Vijaya Rajdhkshay

Samantar By Vijaya Rajdhkshay

  • Rs. 59.00
  • Save Rs. 61


Join as Seller
स्त्री'च्या आंतरिक जगण्याला असलेले प्राधान्य हे 'समांतर' या कथासंग्रहातील कथांचे वैशिष्ट्य आहे. विकल करणार्‍या एकटेपणाला सामोरे जात, स्वत:च्याच सोबतीतील गाढ तृप्ती अनुभवणार्‍या समर्थ 'स्त्री'चे दर्शन या कथांमधून घडते.
-- मीना गोखले.

लोकसत्ता रविवार ३० जुलै २०००
वेगवेगळ्या पिढ्यांमधील "स्त्री"च्या कथा
"समांतर" हा विजया राजाध्यक्ष यांचा कथासंग्रह. वेगवेगळ्या पिढ्यांमधील "स्त्री"ला केंद्रस्थानी ठेवलेल्या कथा या पुस्तकात आहेत. पुस्तकात असलेल्या १२ ही कथांना विविध दिवाळी अंकांमधून पूर्वप्रसिद्धी मिळालेली आहे. पुस्तकाचे शीर्षक असलेली "समांतर" ही पहिलीच कथा. या कथेची नायिका असते डॉक्टर शालिनीताई. मुलीच्या गर्भारपणाची आणि तिच्या बाळंतपणाची चिंता त्यांना लागलेली. त्या काळजीने त्या घेरलेल्या. मुलगा अर.विंद वडिलांच्या मृत्यूनंतर नीट वागत नसल्याची, सख्ख्या बहिणीशी पूर्वीसारखा मोकळेपणाने वागत नसल्याची धारणा. प्रचंड पाऊस कोसळत असताना मुलगी माधवीला प्रसूतिगृहात शालिनीताईंनाच दाखल करावे लागते. मुलगा हे सर्व माहिती असून मित्राकडे पार्टीला गेलेला. तेथे मित्राच्या वडिलांना हार्टॅटॅक येऊन ते इस्पितळात अॅडमिट केले जातात. भरपावसात घरी परतलेला अर.विंद ईबहीण घरी नाहीत पाहून त्यांचा शोध घेत प्रसूतिगृहात येतो. त्या दरम्यान शालिनीताईंच्या मनात उठलेली वादळे ... या सर्वांचे दर्शन "समांतर"मध्ये होते. "प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी" या कथेत अमेरिकेहून काही दिवसांसाठी आलेला निरंजन आपल्या वाट्याला लाभत नसल्यामुळे विषण्ण झालेली ई पाहायला मिळते. त्या ईची समजूत घालणारा स्वतंत्र वृत्तीचा निरंजन या कथेत दिसतो. "कोणीकडून ... कोणीकडे" या कथेत पैसे खाऊन गब्बर झालेल्या पाटकर कुटुंबाचे चित्रण दिसते. त्या कुटुंबातील स्त्री नर्मदा कोंडमारा सहन करते. नवर्‍याच्या पैसे कमविण्याच्या वृत्तीकडे, मुलांच्या संस्कारहीन वागण्याकडे हतबलतेने पाहते. कुटुंबप्रमुखाला त्यानेच लाडावून ठेवलेल्या पोटच्या मुलांकडून वाट्टेल ते एएकावे लागते ... अशी कथा. पुस्तकातील अन्य कथाही अशाच वेगवेगळ्या धाटणीच्या, "स्त्री"च्या जीवनाचे दर्शन घडविणार्‍या अशा.

We Also Recommend