
Samajik Samarasata by Narendra Modi
सुदृढ समाज घडवायचा असेल, तर समता आणि ममता, तसेच बंधुता या गोष्टींची समरसता हवी. संपूर्ण जगाने नवल करावे, असा विकासाचा उच्चांक प्रस्थापित करणारे आणि ‘प्रॉस्परिंग स्टेट’ म्हणून नावाजल्या गेलेल्या गुजरात राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि भारताचे आजचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचे सशक्त समाजनिर्मितीबाबतचे विचारमंथन! समाजातले सारे घटक समरस झाल्याशिवाय एकरूप झाल्याशिवाय समता नांदूच शकत नाही. आपल्या समाजातील जातिभेदाचा रोग बरा करायचा असेल तर त्यासाठी केवळ शिक्षण आणि नोकरीचे बिरुद कामाचे नाही. त्यापलीकडे जाऊन आपली मनं आणि विचारप्रवृत्ती बदलायला हवी व स्वत:ची आणि समाजाचीही मानसिकता बदलायला हवी हा संदेश हे पुस्तक देतं.