Sailee : 13 Saptembar by Shrikant Sinkar

Sailee : 13 Saptembar by Shrikant Sinkar

  • Rs. 259.00
  • Save Rs. 11


Join as Seller
शिवाजी पार्कसारख्या उच्चभ्रू वस्तीत जन्माला येऊनही श्रीकांत सिनकरची उठबस ही पांढरपेशा लोकांमध्ये नव्हती. तो स्वत: जरी त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारसं बोलायचा नाही तरी तो लहानपणीच घरातून पळून गेला होता आणि त्याचं आयुष्य त्यामुळे फूटपाथवरच्या लोकांबरोबरच गेल्याच्या त्याच्याविषयी वदंता होत्या. सध्याच्या भाषेत बोलायचं तर त्याची उठबस ही अधोविश्वातील गयागुजऱ्या लोकांबरोबर होती.त्या काळात दादालोक, हातभट्ट्या, आंट्या, मटकेवाले, सोशल क्लब ह्यांच्याविषयी आमच्यासारख्या थोड्याशा हट के मुलांना आंतरिक ओढ वाटायची. ‘सैली : १३ सप्टेंबर’ जेव्हा वाचलं तेव्हा कळलं की, होय आपल्याला नेमकं हेच जाणून घ्यायचं होतं, म्हणून आपण ह्या दिव्य मुंबापुरीच्या रटरटीत आपल्यापरीने खूप हातपाय मारले, पण श्रीकांत जिथे पोहचला होता तिथपर्यंत आपण नाही पोहचू शकलो. आपल्या पांढरपेशी मर्यादा आपण कितीही झुगारून द्यायचा प्रयत्न केला तरी जीवनाचं आकलन होण्याच्या त्या कुठेतरी आड आल्या.‘जिन जिमलेट’मध्ये श्रीकांतने स्वत:च्या जगण्याबद्दल लिहिलेला एक परिच्छेद त्याचा सच्चेपणा करण्यासाठी पुरेसा आहे. तो असा:माझ्या आयुष्यात मला ज्या ज्या शक्य झाल्या त्या त्या सर्व भानगडी मी केल्या. सर्वच अनुभव घेतले. ते घेतल्यानंतर कोणते जवळ करायचे आणि कोणते दूर करायचे ते माझं मीच ठरवलं आणि तेही स्वत:च्या हिमतीवर आणि स्वत:च्याच पायावर उभं राहून! माझ्या जीवनात मी जे जे काही केलं, त्या सर्व गोष्टींना सर्वस्वी मी जबाबदार! चांगल्या-वाईट सर्वच गोष्टींना! मीच भानगडी केल्या, मीच निस्तरल्या कोणाच्या पाठबळाची अपेक्षा न बाळगता किंवा कोठेही फोन वगैरे न करता! जगात आपल्याला कोणीच नाही. आपण एकटेच आहोत, एकटेच, ही भावना मनात घट्ट रुजवूनच जीवन जगलो.-सतीश तांबे

Customer Reviews

No reviews yet Write a review

We Also Recommend


Customer Reviews

No reviews yet Write a review