
Radiovaril Bhashne Ani Shrutika Part 2 By P L Deshpande (Pu La)
या संग्रहाच्या पहिल्या भागात विनोदी लेखकांची दु:खं, मी ब्रह्मचारी असतो तर..., मी कपडे शिवतो, अशा २८ भाषणे व श्रुतिकांचा अंतर्भाव आहे. परिशिषामध्ये पुलंनी केलेल्या इंग्रजी लेखनाचा समावेश आहे. युज ऑफ साऊंडस अॅण्ड म्युझिक इन रेडिओ प्रोग्रॅम्स, रिव्ह्यू ऑफ मराठी ड्रामा, या विषयांवरील लेखन त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगाच्या वाचनातून आलेला अनुभव जेव्हा माझं नातं एका सूर्याशी जडलं होतं... या भाषणातून ते सांगतात. श्रीयुत हिशेबीमध्ये हिशेबी माणसाचे अफलातून "गुणवर्णन" वाचण्यास मिळते. हे पुस्तक वाचताना त्यातील विनोद निखळ आनंद दिल्यावाचून राहत नाही, हे सांगणे न लगे.