Punha Yado Ki Barat By Shirish Kankar
पुन्हा यादोंकी बारात' वाचून झाल्यावर - खरं म्हणजे
वाचन चालू असतांनाच - माझी पहिली प्रतिक्रिया होती थक्क होण्याची.
मराठी भाषेतून हिंदी चित्रपट या बाजारु समजल्या गेलेल्या
विषयासंबंधात इतके दर्जेदार, अभ्यासपूर्ण, शैलीबाज,
वाचनीय ललित लेखन होत असेल हे माझ्या गावी नव्हते.
शिरीष कणेकरला हिंदी चित्रपटांविषयी व
त्यातील कलावंतांविषयी मनापासून प्रेम आहे ही गोष्ट
मला सर्वात महत्वाची व स्वागतार्ह वाटते.
त्यामुळे इथल्या व्यक्तींची शब्दचित्रे रंगवतांना
त्याच्या लेखणीला आपोआपच हळुवार ओलावा येतो.
ग्लॅमरच्या झगमटामागे दडलेला काळोख त्याला दिसतो.
कलाकाराच्या हृदयातली वेदना त्याला जाणवते.
एखाद्या सुंदर चित्रपटात रंगून जावे तसा मी रंगून गेलो.
शिरीषच्या लेखणीतली भावुकता मला भावते, मला हळवा करते.
इतकी वर्षं फिल्म इंडस्ट्रीत काढल्यानंतरही
मी आतून थोडा हलल्यासारखा झालो.
ग्लिसरीनशिवाय डोळ्यात पाणी येत नाही,
ही माझी समजून खोटी पडली.'
-- राजेश खन्ना यांच्या प्रस्तावनेतून