बोल माधवी

बोल माधवी

  • Rs. 99.00
  • Save Rs. 14


Join as Seller

बोल माधवी …………
किती चातुर्मास
प्रायश्चित्त घ्यायला हवंय मानिनी?
सांग मला
कुणी चतुर्मुख, चतुर्भुज
नाही सांगणार…

वासनांची चतुरंग सेना शृंगारून
चार चार सेनापतींनी
एका अनभिज्ञ अबलेवर
निर्घृण अत्याचार केलेत…
त्या गुन्ह्यांच्या ओझ्याखाली दबलेला
पुरुषांचा वंशज
मी एक पुरुष
आज मुक्त होऊ पाहतो आहे
त्या अश्लाघ्य पितृ-कर्मातून…

सत्य, द्वापार, त्रेता, आणि कली…
चार युगांच्या
या अंतिम टोकावर
उभा आहे मी
शून्याच्या मधोमध
नचिकेताई जिज्ञासांनी
चहुकडून घेरलेला…

बोल, बोल माधवी
स्त्री कधी बोलणारच नाही काय?


We Also Recommend