
PorVay By Ravindranath Thakur
गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या 'छेलबेला' ह्या आत्मकथनाचं 'पोरवय' हे मराठी भाषांतर आहे. वयाची ऐंशी वर्षं उलटून गेल्यावर ह्या कथनातून त्यांनी आपलं पोरवय उभं केलं आहे. पोरवयातल्या डोळ्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं, त्याची ही संस्मरणं आहेत. त्या काळी त्यांचा ज्यांच्याशी संबंध आला, लोभ जडला, त्या आप्तस्वकीयांची, गुरुजनांची, सेवकांची, जोराशांको येथील त्यांच्या भव्य वास्तूची, तिथल्या पुष्करणीची, वृक्षलतांची, गच्चीत संध्याकाळी जमणार्या काव्य-शास्त्र-विनोदाच्या मैफिलींची रविंद्रांनी हळूवार शब्दांनी रेखाटलेली ही स्मृतिचित्रं आहेत. मराठी वाचकाला पोरवयातील रविंद्रांचं दर्शन घडावं ह्या हेतूनं मी हे भाषांतर केलं आहे. हे करतांना बंगाली भाषा, साहित्य, संस्कृतीशी एकरूप झालेल्या श्री. अशोक शहाणे ह्यांनी या कामात मला खूप मदत केली. भाषांतर शक्य तितकं निर्दोष व्हावं ह्यासाठी त्यांनी कटाक्ष बाळगून मला सतत मार्गदर्शन केलं.