Phashi Bakhal by Ratnakar Matkari

Phashi Bakhal by Ratnakar Matkari

  • Rs. 90.00
  • Save Rs. 30


Join as Seller

कुठंही दोरी दिसली, की ते सारं आठवायचं, मग हाताचा चाळा सुरू व्हायचा. सहज दोरीची गाठ मारली जायची. माझं वागणं शहाणपणाचं नव्हतं, हे माझं मलाच कळत असे. पण दोरी पाहिली, की ती रात्र डोक्यात फिरायची. जीव गलबलायचा. दोरखंडाचा गच्च फास कळशीभोवती आवळताना, ती रात्र डोळ्यांसमोर यायची. मी रहाट गडगडत सोडून द्यायचा आणि तळापासून थोड्या अंतरावर कळशी तशीच लोंबकळत ठेवायचा. अधांतरी... फाशी गेलेल्या माणसासारखी. गूढ कथेला मानवी मनाचे कंगोरे देणार्याी आणि त्यामुळेच मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणार्यार, रत्नाकर मतकरी यांच्या कथांचा आगळावेगळा संग्रह.


We Also Recommend