Pausa Nantarch Una By Aruna Dhere

Pausa Nantarch Una By Aruna Dhere

  • Rs. 49.00
  • Save Rs. 51


Join as Seller
काव्य जागवणार्‍या कथा
अरुणा ढेरे यांनी संशोधनात्मक, समीक्षापर लेखन केले, कादंबर्‍याही लिहिल्या, तरी आपल्या मनात त्या असतात एक कवयित्री म्हणूनच. "पावसानंतरचं ऊन'मधील कथा वाचतानाही त्यातील कवितापण खुणावत राहते. "काव्य जागवणार्‍या लयबद्ध कथा' असेच या कथांचे वर्णन करता येईल.
संग्रहातील नऊ कथांचे विषय खूप वेगवेगळे, तरीही आपल्या भवतीचे आहेत; पण या कथा त्या विषयांसाठी नसाव्यातच. त्या त्यातील माणसांसाठी, त्यांच्या मनाच्या कंगोर्‍यांसाठी, परस्परातील नात्यांसाठी अवतरतात. या सगळ्या कथांचे एकच सूत्र दाखवायचे, तर ते संग्रहाच्या शीर्षककथेत दिसते. गॅलरीतून-खिडकीतून आत येणारे पावसानंतरचे ताजे ऊन आपल्या चित्तवृत्ती फुलविण्यासाठी, सुखद आनंद देण्यासाठी पुरेसे असते; पण आपण त्यावर समाधानी नसतो. आपल्याला आणखी काही हवे असल्याची हाव असते. मग त्याच उन्हाचे चटके बसतात. आपण स्वत-लाच जखमी करून घेतो, दु-खी करून घेतो. हे सूत्र सांगता येईल; मात्र या सगळ्याच कथा अनुभवाचे एकेक क्षण समृद्ध करणार्‍या आहेत, हे नक्की.
"ओळख' ही संग्रहातील पहिलीच कथा आणि "उभं राहताना' ही शेवटची कथा! या दोन्ही कथा संग्रहातील उत्तम कथा आहेत. "ओळख'मध्ये उदय, हेमंत, सुनीता आणि गरोदर मीरा आहे. कुलदेवतेच्या श्रद्धेभोवती कथाबीज फुलत राहिले आहे. या देवीला कुळाची, त्याच्या प्रतिष्ठेची काळजी आहे. भलत्या वाटेने जाणार्‍यांना ती पाठीशी घालणार नाही, याची खात्री आहे. श्रद्धेची लय पकडून ही कथा फुलली आहे.
"उभं राहताना' ही कथा नाना आणि अरुंधती या दोघांच्या दृष्टीतून मांडण्यात आली आहे. मुलीने स्वत-चे स्वत-च उभे राहिले पाहिजे म्हणून तिच्या आड कशाही प्रकारे न येता तिच्यावर लक्ष ठेवणारे नाना आणि नाना-नानीला आवडणार नाही हे समजत असूनही, स्वत-ला वाटते तेच करीत अखेर स्वत्वच हरवून बसलेली अरुंधती यांची ही कथा. आपल्यालाही ही कथा हेलकावे देत राहते. "देवभोग'सारखी कथा अस्वस्थ करते. "नवरात्र', "धार', नवीन', "अमितच्या बाई' आणि "एका बाजूला उभे राहून' या कथाही मस्त जमल्या आहेत.

We Also Recommend