
Patras Karan Ki by Arwind Jagtap
मुळात टीव्हीसाठी केलेलं लिखाण पुस्तकरुपात येणं ही तशी दुर्मिळ गोष्ट.त्यामुळे जरा साशंक होतो. पण”ग्रंथाली’ आणि ’झी मराठी’ चा बिझनेस हेड नीलेश मयेकर त्यांच्यामुळे हा पत्रांचा संग्रह पुस्तकरुपात येतोय.पत्र ही जोडणारी गोष्ट होती. इ-मेल वैयक्तिक गोष्ट आहे.इ-मेल वाईट आहे असं नाही.ती जवळीक, तो आपलेपणा इ-मेल मध्ये येऊ शकत नाही. म्हणून पत्रं खास आहेत.अजूनही.जी मांणसं भेटू शकत नाहीत,ज्यांच्याशी मनातलं बोलणं आपल्याला खूप आवश्यक वाटतं.अशा जवळच्या माणसांसाठी पत्र हेच माध्यम आहे. पत्र इतिहास होतात. पत्र संदर्भ होतात. पत्र लिहिणार्या माणसांच्या आयुष्याचा अभ्यास असतात. आपल्याला माहीत आहे की आपला खूप मोठा इतिहास आपल्याला पत्रांमुळे कळलाय.इतिहासातल्या खूप घटणांची संगती, पुरावे पत्रांनी दिलेत.