Alt Text

Panipat By Vishwas Patil

  • Rs. 379.00


Join as Seller
श्री. विश्वास पाटील यांची 'पानिपत' ही कादंबरी केवळ आणखी एक ऐतिहासिक कादंबरी कादंबरी नाही. ती वेगळ्या प्रकृतीची ऐतिहासिक कादंबरी आहे. तिला प्राणभूत असलेली जाणीवही गंभीर आधुनिक मनाची जाणीव आहे. बहुसंख्य ऐतिहासिक कादंबर्‍या या गतकालचा गौरव करणार्‍या आणि ऐतिहासिक मनोवृत्तीचा अंगिकार करणार्‍या असतात. भूतकालात वर्तमान शोधणार्‍या अगर भूत, वर्तमान, भविष्य यांच्यातील अनुसंधान पाहणार्‍या नसतात. हे घडण्यासाठी ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ तपासणारे भान सतत जागे असावे लागते. श्री. विश्वास पाटील हे भान बाळगतात. त्यामुळे 'पानिपत'मध्ये एकमेकात गुंतलेली ऐतिहासिक घटनांची मालिका, उन्हापावसात, थंडीवार्‍यात शेकडो कोस मोहिमेवर निघालेले लढाऊ दल आणि लवाजमे, राजकारणातले डावपेच, खलबते, स्वार्थलोभ, वासनाविकार, ऐतिहासिक व्यक्तींची खाजगी, सार्वजनिक स्वप्ने, रोमहर्षक घटना आणि दैवगतीचे उलटेसुलटे पलटे, किल्ले, तटबंद्या, नद्यानाले, पिकांनी श्रीमंत झालेली भूमी यांची
ठसठशीत वर्णने तर आहेतच पण त्याबरोबर विशिष्ट समाजाचे, वंशाचे आणि जातीजमातीचे उपजत स्वभावविशेष आणि गुणदोष यांची थक्क करणारी जाण आहे. ही जाण या कादंबरीच्या गुणवत्तेचे मर्म आहे. त्यामुळेच ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे राष्ट्रधर्म ओळखणार्‍या एका आधुनिक मनाने घेतलेला एक गतकाळचा शोध असे जाणवते.

पानिपतने केवळ लोकप्रियतेचा इतिहास निर्माण केलेला नाही. यावर्षीचे 'प्रियदर्शिनी' पारितोषिक या कादंबरीला मिळाले ही रसिक मान्यतेची आणि चिकित्सक पसंतीची निशाणी आहे. कादंबरीच्या बहुमुखी गुणवत्तेचा तो उचित गौरव आहे. श्री. विश्वास पाटील यांच्या भावी साहित्यकृतींच्या गुणवत्तेला केलेले ते एक आवाहन ही आहे. त्यांच्या लेखणीचा श्वास मोठा असल्याने या आवाहनाला ते योग्य प्रतिसाद देतील असा भरंवसा वाटतो.

-- म. द. हातकणंगलेकर

'पानिपत' महाकाव्याच्या तोलामोलाची कादंबरी. ... बावनकशी ऐतिहासिक कृती. लेखकाची सर्वसाक्षी उपस्थिती व दोनी बाजूंची तुल्यबळ पेशकश. समग्र मानवी अस्तित्वाचे आणि गूढ भवितव्याचे भान देणारी, उदात्त अतिमानुष मूल्ये उद्घोशित करणारी, कालस्वराची नेमकी लय पकडणारी भव्य अनुभूती ...

-- शंकर सारडा

We Also Recommend