Nivadak Pinge By Ravindra Pinge

Nivadak Pinge By Ravindra Pinge

  • Rs. 149.00
  • Save Rs. 51


Join as Seller

रवींद्र पिंगे यांनी लिहिलेल्या ३०० व्यक्तिरेखांपैकी निवडक २६ व्यक्तिरेखांचा समावेश असलेले हे पुस्तक. रवींद्र पिंगे यांना आपल्या जीवनात वेळोवेळी पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, व. पु. काळे, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, मर्ढेकर, चि. त्र्यं. खानोलकर, वसंत बापट, इंदिरा संत अशा अनेक श्रेष्ठ साहित्यिकांचा तसेच पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, यशवंत देव, सुधीर फडके या गानतपस्वी मंडळींचादेखील दीर्घ सहवास लाभला. शिवाय प्रकाशन क्षेत्रातील केशव कोठावळे, दिलीप माजगावकर आणि श्रेष्ठ संपादक श्री. पु. भागवत, माधव गडकरी व दीनानाथ दलाल यांचा सहवास पण लाभला. या समृद्ध व्यक्तिरेखांच्या संकलनात १३ प्रसिद्ध साहित्यिक, ५ संपादक, ७ गायक आणि १ समाजसेवक अशा बहुविध क्षेत्रातील व्यक्तींचे हुबेहूब व्यक्तिपर चित्रण पिंगे यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीत त्यांच्या स्वभावाच्या अनेक बारकाव्यानिशी तितक्याच समर्थपणे सादर केले आहे.
संपादन - अशोक बेंडखळे

We Also Recommend