
Nimitta by V. P. Kale
आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्र्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वत:ला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबर्या होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वत:चाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वत:ची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.