
Nilu Phule by Dr. V. B. Deshpande
निळू फुले हा खेळीया आयुष्याच्या आणि नाटक - चित्रपट यांच्या रंगमंचावर दीर्घकाळ खेळत राहिला. आयुष्याला थेट भेटत राहिला.. आयुष्य जसे समोर येत गेले तसे स्वीकारीत गेला. आपल्या मस्तीत, खालमानेने, खालच्या स्वरात व्यक्त होत राहिला. प्रत्यक्ष पदवी नसतानाही, पदवीधराला लाजवेल असे आयुष्याचे तत्वज्ञान सांगत राहिला.