Alt Text

Nashayatra by Tushar Natu

  • Rs. 189.00
  • Save Rs. 11


Join as Seller
ही गोष्ट आहे एका अधोगतीची. ब्राऊन शुगरसारख्या जालीम व्यसनांच्या आहारी जाऊन रस्त्यावर आलेल्या एाक तरुणाची. मध्यमवर्गीय संस्कारांतला तरुण व्यसनांमुळे घरदार-नातीगोतीच नव्हे तर आपलं माणूसपणही कसं हरवून बसतो त्याची. माणूस व्यसनांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्याचं काय होतं? व्यसनांचा एकेक टप्पा ओलांडत तो त्यात गुरफटत जातो. ही व्यसनं त्याच्या शरीरावरच नव्हे तर मनोबलावरही परिणाम करतात. आई-वडील अन जीवलगांचं प्रेमही त्याला मदतीचा हात देऊ शकत नाही, आणि आपलं चुकतंय हे कळत असूनही तो व्यसनांच्या फे-यातून बाहेर पडू शकत नाही. बाहेर पडला तरी पुन्हा पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकत राहतो. हे सगळं एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडतं तेव्हा त्याची पुरती ससेहोलपट होते. .. पण मनात जिद्द असेल तर ही नशायात्रा रोखून तो पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकतो. अशाच एका माणसाची प्रांजळ आत्मकथा.

We Also Recommend