Alt Text

Muktanganchi Goshta by Anil Awachat

  • Rs. 189.00
  • Save Rs. 11


Join as Seller
मुक्तांगणला देणगी देतेवेळी पु.ल. म्हणाले होते, एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला तरी, माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी म्हणेन.
पु. ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणार्‍या एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल, तर सार्थक झाले, असे समजेन.
व्यसनी नवर्‍याच्या एका जरी पत्नीला पूर्वीच्या जखमा विसरून चांगले आणि आत्मविश्वासाने जगावेसे वाटले, तर त्याहून काय हवे? एका जरी व्यसनी बापाच्या लहानग्या पोराच्या मनावरचे काळेकुट्ट मळभ दूर होऊन छानसे कोवळे उन्ह पसरेल, आणि त्यात ते पोर मस्त अनिर्बंध नाचेल... त्यापेक्षा अधिक काय मिळवायचे असते?
- अनिल अवचट.

We Also Recommend