
Mohanamal by Chandrashekhar Gokhale
माझी आई (सौ. छायाताई गोखले) कथा फार रंगवून सांगायची. मुळात आईला सतत व्यक्त होण्याची सवय होती किंवा ती तिची गरज होती. त्यामुळे आठवणी, प्रसंग, घटना सांगताना ती रंगून जायची आणि आम्ही मुलं रंगून जायचो. ध्रुवबाळाची कथा आईकडून असंख्य वेळा ऐकली आणि अढळ स्थानाची ओढ तेव्हाच कधीतरी मनात रुजली.