Alt Text

Mazi Chittarkatha by Anil Awachat

  • Rs. 289.00
  • Save Rs. 11


Join as Seller
मी रूढार्थाने चित्रकार वगैरे नाही. आनंदासाठी चित्रं काढण्याचा विरंगुळा शोधलेला मी एक माणूस आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षं मी माझ्यापुरती चित्रं काढतो आहे. लिहितोही आहे आणि चित्रंही काढतो आहे. सगळीच माणसं बालपणी चित्रं काढतात तशी मीही काढली. पण माणसं मोठेपणी चित्रं काढायची थांबतात तसा मी थांबलो नाही. चित्रं काढत राहिलो. मला प्रतिभेचं विलक्षण देणं लाभलं आहे अशी माझी कधीच समजूत नव्हती. मी चित्रं काढत राहिलो ते मी त्यात मनापासून रमतो म्हणून. या पुस्तकामुळे माझी ही चित्तरकथा तुमच्यासमोर येते आहे. ही चित्रं बघून तुमच्यातली चित्रं काढण्याची उर्मी जागी झाली आणि तुम्हीही चित्रं काढू लागलात तर बहार येईल. - अनिल अवचट

We Also Recommend