
Maza Pravas (माझा प्रवास) by Vishnupant Godase Bhataji
1857 च्या प्रकरणाचा इतिहास वरसईकर विष्णुभट गोडसे यांनी तो प्रसंग अनुभवल्यानंतर सुमारे 25 वर्षांनी लिहून काढला. त्यांनी प्रत्यक्ष महाराणी लक्ष्मीबाई झासीवाली यांच्या पदरी काही दिवस होते. झासीचा सर्व प्रसंग त्यांनी डोळ्यांनी पाहिला आणि अनुभवला. तसेच काही अन्य ठिकाणीहि काही प्रसंगांचा त्यांना साक्षात् अनुभव आलेला होता.