Alt Text

Mastaranchi Savali By Krushanabai Narayan Surve

  • Rs. 149.00
  • Save Rs. 31


Join as Seller
कविवर्य नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे यांचे जीवन एकमेकांसाठीच होते. दोघेही तसें अनाथच होते. लहानपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कृष्णाबाईंनी घरच्यांचा विरोध पत्करून नारायण यांचा हात धरला हो कधीही न सोडण्यासाठी. लग्नानंतरची नवलाई वाट्याला आली नाही तरी त्याबाबत खंत न बाळगता तो काल त्यांनी घराच्या शोधात घालविला.
कामगार चळवळीचे काम करणार्‍या सुर्वे यांची ओळख जगाला नंतर कवी म्हणून झाली. त्यानंतर आयुष्य बदलले. या सर्व काळात मिळालेला अनुभव कृष्णाबाई सुर्वे यांनी 'मास्तरांची सावली' मधून कथन केले आहेत. कोणत्याही ऐहिक सुखाची अपेक्षा न धरता मास्तरांची सावली बनून वावरलेल्या कृष्णाबाईंचे हे आत्मकथन उत्कट आहे. पती-पत्नीच्या नात्याचा खरा अर्थ यातून उलगडतो.
शब्दांकन : नेहा सावंत

We Also Recommend