Alt Text

Mark Inglis By Dr Sandeep Shotri

  • Rs. 99.00
  • Save Rs. 101


Join as Seller
अपंगत्वानं खचून न जाता स्पर्धा, चढाया, मोहिमा हेच ज्याचं आयुष्य झालं होतं, त्या मार्क इंग्लिसच्या जीवनपटाची ही एक छोटीशी झलक. लहानपणी प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, किंवा प्रयत्नांती परमेश्वर वगरे म्हणी ऐकलेल्या असतात. या म्हणींचा प्रत्यय देणारी ही मार्कची कहाणी, स्वप्नांच्या पलीकडची. याच जीवनशैलीची त्याला ओढ लागलेली होती आणि नवे नवे विक्रम करण्याचं व्यसनच लागल्यासारखं झालं होतं. त्याचं मन सतत याच विचारांभोवती फिरत असे. नियतीपुढं हार मानून गप्प बसणं, हे त्याच्या स्वभावातच नव्हतं. या स्पर्धा, चढाया, मोहिमांसाठी त्याने केलेली तयारी, उपसलेले कष्ट, घेतलेले अपरिमित प्रयत्न, अपयशानं निराश न होता परत परत उभं राहण्याची ताकद याचं सविस्तर वर्णन वाचताना अंगावर काटा उभा राहतो. त्याच्या आयुष्यातील आशा निराशेचा खेळ सुन्नही करून टाकतो. हाडामांसाचा माणूस हे असं काही करू शकतो, याबद्दल एकीकडे नतद्रष्ट मनात उगीचच शंकाही निर्माण होत असल्या तरी दुसरीकडे त्यातील सत्यतेचीही खात्री पटते. मार्कच्या आयुष्याची ही कहाणी म्हणजे विलक्षण जिद्दीची कहाणी आहे. जिद्दीला पेटलेला माणूस काय काय करू शकतो आणि नियतीलाही कसा नमवतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.

We Also Recommend