
Manatalya Gharat by Pravin Davane
‘घर’ नावाची एक गोजीरवाणी संस्था, हे मानवी प्रतिभेला आलेलं एक प्रसन्न फूल आहे. आज अनेक कारणांनी या फुलाच्या पाकळ्या हादरताना.... दचकताना दिसतात. स्पर्धेच्या हिंसक धावाधावीत नात्यांना होणारी इजा, सुसंवाद आणि रसिकते अभावी परस्परांत निर्माण होणारी रूक्षता, आपलं यश, शिक्षण, पैसा सारं व्यर्थ करून टाकते आहे. घर नावाच्या समाजाचं आणि समाज नावाच्या घराच्या काळजीनं प्रवीण दवणे यांनी केलेलं हे लेखन म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या उत्कट आणि संवेदनाशील लेखणीनं वाचकांच्या ‘मनातल्या घरात’ ते केव्हा जाऊन पोहोचतात ते कळतही नाही... - नवचैतन्य प्रकाशन