
Malavarachi Maina by Anand Yadav
आनंद यादव विनोदी कथा शाब्दिक कोटिक्रम किंवा भाषिक विनोदावर आधारलेली नाही. ती ग्रामीण जीवनातील व्यक्ती, प्रसंग, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती यांच्यावर आधारलेली आहे. या बाबतींत विसंगती, उथळ जगण्याच्या प्रवृत्तींतून निर्माण झालेली हास्यास्पदता ते अचूकपणे टिपतात आणि त्यातून त्यांची कथा ऐटबाज भाषेत आकाराला येते. यादवांची विनोदी कथा नुसतीच मनोरंजनवादी नाही. ती परिस्थितीवर, समाज जीवनावर आणि मानवी स्वभावावर विनोदी शैलीत भाष्य करते. या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या विनोदी कथेला पुष्कळ वेळा कारूण्याची झालर लाभते. त्यामुळे यादवांची विनोदी कथा वाचकाला शेवटी अंतर्मुख करते. हे या कथेचं खास वेगळेपण मानावं लागतं.