Majet Jagav Kas by Shivraj Gorle

Majet Jagav Kas by Shivraj Gorle

  • Rs. 139.00
  • Save Rs. 111


Join as Seller

एक असतो निराशावादी माणूस.
त्याच्या हातात असतो अर्धा भरलेला पेला.
तो पेला अर्धा रिकामा आहे, याचं दु:ख करीत
तो माणूस कसंबसं जगतो, खंगत मरतो.

दुसरा असतो आशावादी माणूस.
त्याच्या हातात असतो अर्धा रिकामा पेला.
तो पेला अर्धातरी भरलेला आहे, याचंच समाधान मानत
तो माणूस जगतो, वर्षानुवर्षं नुसतं जगत राहतो.

पण त्या दोघांच्याही दुस-या हातात
पाण्यानं भरलेला तांब्या असतो, असू शकतो.
त्यातलं पाणी पेल्यात ओतावं, तो पूर्ण भरावा आणि
पोटभर पाणी प्यावं, एवढी साधी गोष्ट त्या दोघांनाही
कुणीच कसं सुचवत नाही, याचं आश्चर्य वाटतं.

त्या दोघांना ती साधी गोष्ट सुचवण्याचं
आजवर कुणी न केलेलं विधायक काम,
मराठी भाषेपुरतं पार पाडणारं
खेळकर, खुमासदार शैलीतलं 'क्रांतिकारक' पुस्तक.


We Also Recommend