Lokshahi Jindabad by Suhas Palshikar, Yogendra Yadav, Peter D'Souza
लोकशाहीबद्दल लोक काय विचार करतात? लोकशाही आपल्या देशासाठी योग्य आहे, असं किती लोकांना वाटतं? लोकशाही व्यवस्थेबद्दल लोक कितपत समाधानी आहेत? विविध स्तरांवरील लोकनियुक्त सरकारं-न्यायसंस्था-पोलिस-लष्कर आणि माध्यमं यांवर लोकांचा कितपत विश्वास आहे? राजकीय पक्ष आपल्या आशाअपेक्षांचं प्रतिनिधित्व करतात असं लोकांना वाटतं का? राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीऍवजी घराणेशाहीचा प्रभाव अधिक आहे, असं लोकांना वाटतं का?
बिगरपक्षीय चळवळी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या योगदानाकडे लोक कसं पाहतात? ज्या देशात लोकशाही व्यवस्थेवर वारंवार आघात झाले आहेत तिथल्या लोकांची लोकशाहीबद्दल काय भावना आहे?
अशा अनेक कळीच्या प्रश्नांचा भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ आणि श्रीलंका या दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापक सर्वेक्षण करून शोध घेतला गेला. त्यावर आधारित पुस्तक.