Lajjatdar Arogya By Sanjeevani Rajwade
आरोग्याबद्दल सध्या जागरूकता निर्माण झालेली आहे. डॉ. संजीवनी राजवाडे यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य कसं राखता येईल आणि आयुष्य लज्जतदार कसं होईल, याविषयी मार्गदर्शन करणारं "लज्जतदार आरोग्य‘ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुर्वेदातील कुठलीही औषधांची लांबच लांब यादी न देता, मुळातच औषध घ्यायला लागू नये, यासाठी आपली जीवनपद्धती कशी असली पाहिजे, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.
मसाले, तेल, तूप, भाज्या, रसदार फळं, सुकामेवा, यांचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदे सविस्तरपणे इथं दिले आहेत. घरातील गृहिणीनं सजगपणे जर समजा भाज्या आणि फळांचा आहारात योग्य वापर केला, त्याचबरोबर मसाल्यांचा उपयोग करताना त्याचे गुणधर्म जाणून घेतले, तर छोट्याछोट्या आजारांसाठी डॉक्टरांकडं जावंही लागणार नाही, असा लेखिकेचा दावा आहे.
फळं तसेच भाज्या वेगवेगळ्या विकारांवर कशा उपयुक्त आहेत, त्याचा उपयोग कसा करायचा, याविषयी शास्त्रीय माहिती देऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. वापरासंबंधीचे तक्ते आणि नेमकी माहिती, यामुळे वाचकांचा गोंधळ होत नाही.