
Ladha Lokpalcha Udrek Aam Admicha by Dhananjay Bijale
देशात आज ५५ कोटी मोबाईल फोन, तर चौदा कोटी इंटरनेट कनेक्शन्स आहेत. रस्त्यावर दर मिनिटाला वीस नव्या कोNया मोटरसायकल, तर तासाला दोनशे चकचकीत चारचाकी गाड्या दाखल होत आहेत. सुबत्तेची गंगा दुथडी भरून वाहत असताना दुसNया बाजूला जनता भ्रष्टाचार, अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरत आहे. ‘भारत हा जणू गरीब लोकांचा श्रीमंत देश बनला आहे.’ नेमक्या अशा काळातच आम आदमीच्या आणि समाजसेवकांच्या चिवट लढ्याने देशाला ‘लोकपाल’ मिळाला. अन्यायाविरोधात लोक आता कोणाचे नेतृत्व नसले, तरी संघर्ष करीत आहेत. जिवंत, सशक्त, सळसळत्या लोकशाहीसाठी हे आश्वासक चित्र आहे. समाजाच्या सर्व थरांत सध्या घुसळण सुरू आहे. हे सारे नेमके आताच का घडत आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न....