Krantisury By Vishwas Patil

Krantisury By Vishwas Patil

  • Rs. 65.00
  • Save Rs. 65


Join as Seller
म. टा. रविवार २१ मार्च २०१०
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून नाना प्रकारची, चित्रविचित्र स्वभावाची आणि धडाडीनं काम करणारी अनेक व्यक्तिमत्त्वं पुढे आली. महाराष्ट्र हे तर कार्यर्कत्यांचे मोहोळच; मग साहजिकच अशी अनेक माणसं या आंदोलनानं उभी केली. सातार्‍याचे नाना पाटील हे असंच एक व्यक्तिमत्त्व. नाना पाटील हे नाव घेतलं की सातार्‍याचं 'पत्रीसरकार' डोळ्यापुढे उभं राहतं. फर्डा वक्ता, डाव्या चळवळीचा सेनानी, पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारा झुंजार नेता, मार्क्सवादी आणि तरीही माळकरी ... अशी नाना पाटलांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे एखाद्या कादंबरीपेक्षाही अद्भूत असं जीवन. त्यामुळे साहजिकच कोणालाही त्यांचं चरित्र लिहिण्यापेक्षा त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचाच मोह व्हावा. तसाच तो प्रख्यात लेखक, 'पानिपत'कार विश्वास पाटील यांना झाला आणि त्यातून 'क्रांतिसूर्य' ही कादंबरी उभी राहिली. लेखक पाटीलबुवांची 'क्रांतिसिंह' नाना पाटलांवर असीम श्रद्धा आहे, हे पानापानातून जाणवतं. त्यामुळेच ही कादंबरी वाचनीय झाली आहे.

We Also Recommend